कोरोना रुग्णसंख्या सहा हजारांवर   

नवी दिल्ली : देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सहा हजरांवर पोहोचली आहे. मागील २४ तासांत ७६९ नव्या रुग्णांची नोंद झाली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले.देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळमध्ये आहेत. त्यानंतर, गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.कोरोनाच्या वाढत्या रुग्णंसख्येमुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधे उपलब्ध ठेवण्यास सांगितले. बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. यावर्षी, जानेवारीपासून कोरोनाने ६५ जणांचा बळी घेतला. २२ मे रोजी देशात कोरोनाचे २५७ रुग्ण होते. मात्र, १५ दिवसांत रुग्णसंख्या सहा हजारांवर पोहोचली.कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली २ आणि ३ जून रोजी तांत्रिक आढावा बैठक घेण्यात आली. 

Related Articles